Showing posts with label photoblog. Show all posts
Showing posts with label photoblog. Show all posts

Monday, December 14, 2009

क्षण क्षण ओथंबले... जसे दव पानी ओले...


क्षण क्षण ओथंबले
जसे दव पानी ओले

क्षण उनाड भाबडे
ओठी स्मितहास्य वेडे
क्षण नाजुक हळवे
डोळा गहिवर ओले

क्षण हसरे आनंदी
जणू लहर स्वछंदी
क्षण एकाकी कालोखे
मना सांजेचे विळखे

क्षण क्षण ओथंबले
जसे दव पानी ओले

Sunday, November 8, 2009

दोन दिवसाच जीवन तरी... रानफुल ती हसत होती...


रानातल्या त्या वाटेवर
स्वछंद झुलत होती
दोन दिवसाच जीवन तरी
रानफुल ती हसत होती

न कशाचच भय
न कशाची चिंता होती
प्रत्येकाच्या ओठांवर
हास्याची लकेर होती

आनंदाने जगण्याच रहस्य
उघड उघड सांगत होती
दोन दिवसाच जीवन तरी
रानफुल ती हसत होती