राबताना देह माझा, जाळुनी उन्हे पळाली
खेळताना खेळ खोटा, रापुनी तान्ही जळाली
वाढल्या कित्येक पंक्ती, दिवसरात्री जेवणाच्या
वाढताना ताट माझे, भाकरी उष्टी मिळाली
मीच माझी शोधली ही, वाट एकाकी उद्याची
चालताना या जगाची, वाट सामोरी मिळाली
जागताना रात्र वेडी, आसवांनी चिंब न्हाली
भाबड्या वेड्या दिसाला, ओढ ती का ना कळाली
सोसताना दु:ख माझे, सोसली दु:खे जगाची
साधणारी स्वार्थ काही, बेगमी नाती मिळाली
योगेश, ही रचना तांत्रिकदृष्ट्या काही बारीक तृटी सोडल्यास अगदी सही आहे.
ReplyDeleteमक्त्यात ऊन्हे या शब्दाच्या ऐवजी दुसरा काही त्याच अर्थाचा शब्द जुळला, तर अधिक योग्य होईल, कारण उन्हे हा शब्द दीर्घ सहसा वापरला जात नाही. तो ओढून-ताणून बसवल्यासारखा वाटू नये, म्हणून प्रयत्न करावा. तसं तर काव्यात असे बदल प्रत्यही केले जातात, पण शक्यतो गज़ल सहज व्हावी, म्हणून हे टाळावे.
तसंच दीनरात्री या शब्दाच्या जागी दिवसरात्री अधिक सहज आणि अर्थपूर्ण देखिल आहे. कारण दीन या शब्दाचा अर्थ गरीब, बिचारा, दुबळा असा होतो. दिवस या अर्थानं दिन हाच शब्द योग्य आहे. याच द्विपदीमधील ऊष्टी हा शब्द उष्टी असाच योग्य आहे, मात्रांच्या आणि रचनेच्या दृष्टीनंही. तो कदाचित टायपो असावा.
बाकी गज़ल अतिशय सुरेख आहे, मतला तर खूप खूप भावला.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद,
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या सुचना खरोखरच खूप चांगल्या आहेत... त्यानुसार मी बदलही केलेत...