Thursday, August 19, 2010

मीच माझी शोधली ही, वाट एकाकी उद्याची

राबताना देह माझा, जाळुनी उन्हे पळाली
खेळताना खेळ खोटा, रापुनी तान्ही जळाली

वाढल्या कित्येक पंक्ती, दिवसरात्री जेवणाच्या
वाढताना ताट माझे, भाकरी उष्टी मिळाली

मीच माझी शोधली ही, वाट एकाकी उद्याची
चालताना या जगाची, वाट सामोरी मिळाली

जागताना रात्र वेडी, आसवांनी चिंब न्हाली
भाबड्या वेड्या दिसाला, ओढ ती का ना कळाली

सोसताना दु:ख माझे, सोसली दु:खे जगाची
साधणारी स्वार्थ काही, बेगमी नाती मिळाली

Friday, May 21, 2010

दिवाळी !!!

दिवाळी????? म्हणून दचकन्याच काहीच कारण नाहीय, काल - परवाच तर साजरी झाली छत्तीसगढ़ मधल्या दंतेवाड्यात. नक्सलवाद्यानी बरेच फटाके फोडले. या नक्सलवाद्याना पहिल की लहानपनीची दिवाळि आठवते, तेव्हा दिवाळीत खायला फराळ नसला तरी चालायचा, नविन कपडे मिळाले नाही तरी बेहत्तर पण फटाके आणि बन्दुक तर हवीच मग काहीही होवो.
एकदा बन्दुक आणि केप मिलाळी की मग चकमक सुरु, कधी टीम बनवून तर कधी एकएकट कधी झाडामागे, कधी एखाद्या गाड़ीमागे लपून समोरच्या वर गोळ्या झाडायच्या त्यांच्या गनिमी काव्यासारख (अम्बुश लावून) खेळता खेळता दिवसाची रात्र व्हायची पण हौस काही फिटायची नाही, बळजबरीचा विश्राम दोनदा - जेवणासाठी आणि सोबतचा दारूगोला संपल्यावर पुढची कुमक मिलेपर्यंत.
हल्ली तर आधुनिक बंदुका मिळतात ज्या एका मिनटात ४७ का ५६ गोळ्या झाडतात, पण त्या बाजारात मिळत नाहीत त्या इम्पोर्ट कराव्या लागतात चीन किवा पाकिस्तानातून आणि त्या मिळवन्यासाठी एक तर तुम्ही नक्सलवादी असायला हवे नाही तर अतिरेकी

नंतर थोड मोठ झाल्यावर रशी बॉम्ब हा नविन प्रकार समजला याचा आवाज कानठल्या बसवनारा हा रशी बॉम्ब लावण्याची एक पद्धत होती त्याच्या आजुबाजुला कणकेच (तांदलाच की गव्हाच आठवत नाही) पीठ पसरायच आणि द्यायची वात पेटवून, बॉम्ब जेव्हा फुटतो तेव्हा बाजूने आगीचे लोळ येतात ही शक्कल त्यांच्या भू सुरुंगाशी काहीशी मिळती जुळती.

छत्तीसगढ़ मध्ये नक्सलवादी म्हणून गट आहे त्याना दिवाळी सण खुप आवडतो.
हा सण फक्त भारतपुरता मर्यादित राहिला नसून आता ग्लोबल झाला आहे अधून मधून न्यूज़ चैनल वर वर्त्तमान पत्रात त्याबद्दल माहिती येत असते
हल्लीच पाकिस्तानहुन काही निवडक पाहुने हा सण साजरा करण्यासाठी मुंबईत आले होते त्यानी आपल्यासोबत अध्ययावत बंदुका आणल्या होत्या मुंबईत प्रवेश केल्यानंतर छत्रपति शिवाजी टरमिनस स्थानकावर हा सण त्यानी यथेच्छ साजरा केला यातील एक पाहुना अजूनही आपला पाहूनचार घेत आहे।

मी दिवाळीला फटाके फोडून बरीच वर्ष झाली पण अजूनही फटाके फुटतायत आणि तेहि फक्त दिवाळीला नव्हे तर वर्षाच्या बाराही महीने देशाच्या, जगाच्या वेगवेगळ्या भागातून

Monday, March 8, 2010

देह पडू दे गळोनि... जावू दे मातीत मिळोनि...


 देह पडू दे गळोनि
जावू दे मातीत मिळोनि 

करा सुखासाठी अर्ज 
डोई उधारीचे कर्ज 
होई जन्म सारा खर्च 

मनी नित्य नवा स्वार्थ 
नाही नात्यालाही अर्थ 
जाई जन्म सारा व्यर्थ 

सारी विषयाची आस 
गळा वासनेचा फ़ास
होई जन्माचा ह्या ह्रास

देह पडू दे गळोनि
जावू दे मातीत मिळोनि