![]() | चैत्र वैशाख वणवा, संगे रंगाचा सोहळा लाली मोहराची नभी, दारी सोनसळी सडा चैत्र वैशाख वणवा, काडी काट्यासाठी धावा नवे घरटे झाडाशी, नवा संसाराचा गाडा चैत्र वैशाख वणवा, कानी कुंजरव नवा, साद मिलनाची देई, धुंद कोकिळेचा पावा, चैत्र वैशाख वणवा, देई नाविन्याची आस, तनामनामध्ये कोंदे, संथ हिरवाईचा ध्यास. |
