प्रश्न सरकारच्या सार्वभौमत्वाचा!
http://maharashtratimes।indiatimes।com/articleshow/7953652।cms#write
स्टार माझा वर राजकीय विश्लेषक म्हनून येणारे प्रताप आसबे ज़े काही विश्लेषन करतात ते बर्याच वेळा आकलना पलीकडचे असते. महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील लेखातील काही मुद्दे जरी विचार करण्या सारखे असले तरी एकून लिखाण बाळबोध व हास्यास्पद आहे.
आसबे यानी छान आलंकारीक शब्द येथे वापरले आहेत. परीक्षेत लिहून गुण प्राप्त करण्यासाठी हा उत्तम निबंध होऊ शकतो. संसदीय लोकशाहीचा पाया उखडू शकतो ईतकेच लिहीणे संयुक्तिक असताना वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकराचे नाव घेण्याचा मोह ते आवरू शकत नाहीत. कदाचित त्याने वाक्याला वजन मिळत असेल. पण मग ही एकप्रकारे चिथावनि होत नाही का?. घटनेत दुरुस्ती किवा त्यावरील साधक बाधक चर्चा ही नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी असते का?
आसबे म्हणतात अण्णानि कधी राष्ट्रवादी कधी कॉंग्रेस कधी शिवसेना कधी भाजप विरुद्ध आंदोलने केली. त्यामुळे भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनाची चलती होती. मग यात चुक काय? ..
आसबे साहेब किरण बेदीना सेलिब्रिटी म्हणतात. यावर हसण्या पलीकडे आपण काय करू शकतो. त्यायोगे आसबे साहेब जे स्टार माझा च्या बहुतेक चर्चेत विश्लेषक असतात तेही आमच्यासाठी सेलिब्रिटीच नव्हे का? शेवटच्या परीछेदात तर साहेब तटस्थ न राहता अगदी बाळबोध आरोप लावत आहेत. माजी कायदा मंत्री, वकील, माहीतीचा अधिकार चळवळिचा पुढारी, आयपीएस अधिकारी असताना हे म्हणतात कायद्याचे ज्ञान नसणार्यांकडून अजुन काय अपेक्षित असणार.
"संसदीय लोकशाही मोडून काढणे हा त्यांचा उघड अजेंडा आहे". हा आरोप एका विश्लेषकाला शोभत नाही. आसबे या लोकाना उच्चभ्रू म्हणतात, त्यांचा उच्च भ्रू असण्याचा निकष कोणता हे काही समजत नाही.
आसबे साहेब आमच दुर्दैव हे की आम्ही तुमच्या सारख्या एक्सपर्ट ना रोज एकतो.
ता. क. -
जन लोकपाल बिला मधील त्रुटिंविषयी इन्टरनेट वर बरयाच ब्लोग्गर्सनि मुद्देसुद लिहिले आहे, (उदा. - http://realitycheck.wordpress.com/2011/04/06/jan-lok-pal-caveat-emptor/ ), पण राजकीय विश्लेषक म्हणून वावरनारया प्रताप आसबे यांचा हा लेख अगदीच बाळबोध आणि सरकारधार्जिना वाटतो.