क्षण क्षण ओथंबले
जसे दव पानी ओले
क्षण उनाड भाबडे
ओठी स्मितहास्य वेडे
क्षण नाजुक हळवे
डोळा गहिवर ओले
क्षण हसरे आनंदी
क्षण हसरे आनंदी
जणू लहर स्वछंदी
क्षण एकाकी कालोखे
मना सांजेचे विळखे
क्षण क्षण ओथंबले
जसे दव पानी ओले

रानातल्या त्या वाटेवर
स्वछंद झुलत होती
दोन दिवसाच जीवन तरी
रानफुल ती हसत होती
न कशाचच भय
न कशाची चिंता होती
प्रत्येकाच्या ओठांवर
हास्याची लकेर होती
आनंदाने जगण्याच रहस्य
उघड उघड सांगत होती
दोन दिवसाच जीवन तरी
रानफुल ती हसत होती